Praniti Shinde  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Praniti Shinde: 'कर्नाटकामध्ये काँग्रेसची सत्ता येणार',आमदार प्रणिती शिंदे यांचा दावा

सध्याचे वातावरण हे काँग्रेसला पुरक असून कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येईल, आमदार प्रणिती शिंदेंचा दावा

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकातील दावणगिरी मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे. या मतदारसंघात मी निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. माझ्या निरीक्षणानुसार, सध्याचे वातावरण हे काँग्रेसला पुरक असून कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येईल, असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेनंतर राजकीय विषयावर बोलताना त्या बोलत होत्या. सध्या कर्नाटकात निवडणुका सुरू आहे. या कर्नाटक निवडणूक प्रचारात सोलापूर जिल्ह्यातील आमदारांचा सहभाग आहे. भाजपचे दोन्ही देशमुख बेळगाव आणि विजापूर मतदारसंघाची जबाबदारी सांभळत आहेत. तर ‘आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे असलेली जबाबदारी आणि कर्नाटकातील जनतेचा कौल’ या विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

यावेळी आमदार शिंदे पुढे म्हणाल्या की, कर्नाटकामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. माझ्यावर दावणगिरी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. मी या मतदारसंघात निरीक्षक म्हणून काम पहिले आहे. कर्नाटकातील राजकीय वातावरण पाहता काँग्रेस पूरक असल्याचे दिसून येते. परंतु, तेथील काँग्रेस नेत्यांनी मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. काँग्रेसचे स्थानिक नेत्यांनी आपली सत्ताच येईल, या अविर्भावात न राहता आणि अतिआत्मविश्वास न बाळगता काम करणे गरजेचे आहे.

कारण विरोधी पक्ष भाजप हा वेगवेगळ्या मार्गाने काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम करीत आहे. भाजप नेहमीप्रमाणे ईडी व इतर चौकशी ही शस्त्र वापरून विरोधकांना वेठीस धरत आहेत.

मी शहर ‘मध्य’चीच आमदार

भविष्यातील खासदार म्हणून चर्चा आहे, या विचारलेल्या प्रश्नावर म्हणाल्या शिंदे-फडणवीस सरकार महापालिकांच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहे. विधानसभा आणि लोकसभा या तर फार लांबच्या गोष्टी आहेत. परंतु, मी सध्या सोलापूर शहर मध्यचीच आमदार आहे, असे सांगत त्यांनी खासदारकीच्या निवडणुकीच्या विषयाला त्यांनी बगल दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT