नाना पटोले
नाना पटोले e sakal
महाराष्ट्र

काँग्रेस 'या' निवडणुकाही स्वबळावर लढणार, पटोलेंचे स्पष्ट संकेत

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : लोकसभा, विधानसभा पाठोपाठ जिल्हापरिषद, महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुका (local bodies election) स्वबळावर लढविण्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (maharashtra congress president nana patole) यांनी शनिवारी (ता.12) स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे स्थानिक स्तरावर काँग्रेस पदाधिकारी कामाला लागले आहेत. (congress will contest local bodies election separately says nana patole)

मार्च 2022 मध्ये जिल्हापरिषद तसेच महापलिकेचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यादृष्टीने आतापासूनच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी जिल्हापरिषेसह महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या असल्याने अनेक इच्छुकांनी आतापासूनच देव पाण्यात घातले आहेत. त्यातच काही महिन्यांनी होऊ घातलेल्या जिल्हापरिषद तसेच महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाशी तडजोड होणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात असतानाच खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच ‘एकला चलो रे' चा नारा दिल्याने काँग्रेसचे पदाधिकारी स्वबळासाठी सज्ज झाले आहेत. जिल्हापरिषद निवडणुकीपूर्वी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे, तसेच महापालिकेची निवडणूक यंदा वॉर्ड पद्धतीने घेण्याबाबत सरकारकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहे. त्यादृष्टीने आता जिल्हापरिषद स्तरावर इच्छुकांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. विशेष म्हणजे विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्रा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणे अपेक्षित असून त्यानंतर जर पोटनिवडणूक झाली तर त्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार राहील, असे स्पष्ट संकेत नाना पटोले यांनी दिले.

अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा -

रिपाईचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा.सू.गवई यांच्या काळापासून अमरावती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा कायम आहे. आता सुद्धा अमरावती मतदारसंघावर दावा कायम असून पुढील उमेदवार काँग्रेसचाच असणार असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT