Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics :...तर विद्यमान आमदारांचे तिकीटही कापले जाणार; विधानसभेच्या उमेदवारीबद्दल काँग्रेसचा मोठा निर्णय

Assembly Election Maharashtra Politics Latest News : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राज्यातील राजकीय पक्षांमधील हलचालींना वेग आला आहे.

रोहित कणसे

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राज्यातील राजकीय पक्षांमधील हलचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच काँग्रेस पक्षातील विद्यमान आमदारांच्या बाबती एक मोठी बातमी समोर आली आहे. या आगामी विधानसभेत काँग्रेसच्या सिटिंग आमदारांची उमेदवारी देखील धोक्यात असल्याची माहिती समोर आली आङे.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मेरिटवर जागा वाटप व्हावे यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही होते. मात्र विधानसभा निवडणुकीत मात्र याच मुद्यावरून काँग्रेस पक्ष माघार घेणार असल्याचे समोर आले आहे. साम टीव्हीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या काँग्रेसचा जो सीटिंग आमदार आहे त्याला देखील तिकीट द्यायचं की नाही हे अहवाल पाहून निर्णय घेतला जाणार आहे.

काँग्रेस पक्षाकडून राज्यातील प्रत्येक जागेची चाचपणी केली जाणार आहे आणि त्यानंतर जर अहवाल आमदाराच्या विरोधात असेल तर तिकीट नाकारलं जाणार आहे. लोकसभेत जिथे सीटिंग खासदार आहे, ती जागा त्या पक्षाने लढवावी ही भूमिका काँग्रेसची होती, मात्र विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग झाल्याने पक्षाने विधानसभा निवडणुकीत रिस्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सीटिंग आमदारांच्या जागा देखील धोक्यात आल्या आहेत.

काँग्रेसकडून आता सर्व आमदारांच्या कामाचा आराखडा तयार केला जाणार आहे आणि त्यानंतरच जागा लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.

मनसेची तयारीत आघाडी

राजकीय पक्ष विधानसभान निवडणुकीच्या तयारीला लागले असले तरी यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडी घेतली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मनसेने दोन उमेदवारांची नावे देखील जाहीर केली आहेत. मनसेने शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना, तर पंढरपूरमधून दिलीप धौत्रे यांना विधानसभेसाठी संधी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana News : गरिबीमुळे लग्न जुळत नाही, बुलढाण्यात दोन तरुणांनी जीवन संपवलं

LSG vs RR Live: रिषभ पंतचा 'Super Duper' झेल; राजस्थानचे सुरमा फेल... शमीची हॅटट्रिक हुकली पण, निम्मा संघ ७७ धावांवर गार Video

Latest Marathi News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

LSG vs RR Live: वैभव सूर्यवंशीची दुसरी धाव अन् ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉचा यांचा मोठा विक्रम मोडला! दिग्वेश राठीने भन्नाट झेल टिपला Video

SCROLL FOR NEXT