पृथ्वीराज चव्हाण Sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास देशातील लोकशाही संपेल : पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवप निशाणा साधला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मोदी (Nareandra Modi) सरकारच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात महागाईचा निर्देशांक आठ टक्क्यांवर गेला असून, बेकारीचा दरही उच्च पातळीवर पोचला आहे. मात्र, मंदिर, मशिदीचा वाद उपस्थित करून देशात दंगली घडविणे व त्याद्वारे निर्माण झालेल्या धार्मिक धृवीकरणाद्वारे स्वतःची पोळी भाजून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपचा डाव आहे. हा पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आल्यास देशातील लोकशाही संपेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शुक्रवारी (ता. ३) दिला.

येथील काँग्रेस (Congress) भवनात पत्रकारांशी संवाद साधताना प्रादेशिक पक्षांची भूमिका, काँग्रेसअंतर्गत संघटनात्मक निवडणुका, राज्यसभा निवडणूक, काश्‍मीर प्रश्‍न, केंद्राचे खासगीकरणाचे धोरण याविषयावर मतप्रदर्शन करताना समविचारी पक्षाच्या सहकार्याने काँग्रेसच भाजपचा पराभव करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष शरद आहेर यांनी शहराध्यक्षपदाच्या राजीनाम्यामागील भूमिका विशद केली. या वेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी खासदार प्रतापराव वाघ, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, माजी नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, डॉ. वसंत ठाकूर, विजय राऊत, कल्पना पांडे, उद्धव पवार, अण्णा मोरे, हनीफ बशीर यांच्यासह विविध सेलचे प्रमुख उपस्थित होते. उदयपूरच्या राष्ट्रीय शिबिराला देशभरातून ४३० प्रतिनिधी उपस्थित होते. पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी आयोजित या चिंतन शिबिरातून सोनिया गंधा यांनी काँग्रेसचे पूर्णवेळ पक्षाध्यक्ष म्हणून काम करण्यास मान्यता दिल्याचे सांगतानाच अशी शिबिरे देशभर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिर्डी येथे नुकतेच पार पडलेले शिबिर हा त्याचाच एक भाग असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या विक्रीतून २८ लाख कोटी रुपये जमा केले, परंतु एवढे करूनही न भागल्याने त्यांनी आयुर्विमा महामंडळासह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची विक्री करून आता देश गहाण ठेवण्याची वेळ आल्याचा आरोप केला. पुढील निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही संपेल, असा इशारा देतानाच त्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज प्रतिपादन केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT