Kirit-Somaiya sakal media
महाराष्ट्र बातम्या

पारनेरच्या कारखान्यांतील घोटाळ्याचे पुरावे सादर करणार; सोमय्यांची माहिती

गुरुवारी कारखान्याची पाहणी करणार असल्याची माहिती

विठ्ठल तांबे

धायरी : जरंडेश्वर साखर कारखान्यानंतर पारनेरच्या साखर कारखान्यांतील घोटाळ्याबाबत पुरावे सादर करणार असल्याची माहिती भाजपनेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसेच गुरुवारी पारनेर साखर कारखान्याची पाहणीही करणार असल्याचे सोमय्या म्हणाले. आज (ता. २०) सोमवारी त्यांनी नऱ्हे येथे माध्यमांशी संवाद साधला.

सोमय्या म्हणाले, उद्या ईडीकडे गडहिंग्लज कारखान्याबाबत तक्रार करणार आहे. गुरुवारी पारनेर साखर कारखाना येथे पाहणी करणार असून पारनेर कारखान्यात पवार यांचे जवळचे मित्र अतुल चोरडिया यांनी २३ कोटी रुपये दिले आहेत. या बाबतीत ईडीसोबत चर्चा करणार असल्याचे सांगून त्यांनी आयकर विभाग व सहकार मंत्रालयाची चौकशी सुरू असल्याचे म्हटले.  ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी गडहिंग्लज साखर कारखाना कसा काबीज केला, हसन मुश्रीफ यांनी बेनामी कंपनीला कसा दिला याचे पुरावे त्यांच्याकडे असल्याचेही त्यांनी त्यांनी सांगितले.

यापूर्वी माझ्या पत्नीवर आरोप केले, माझी थोडी जर चूक असती तर मला ठाकरे सरकारने अंदमान निकोबारला पाठवलं असतं, असेही सोमय्या यावेळी म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना सोमय्या यांच्यासोबत यावेळी खडकवासला खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर, जिल्हा परिषद सदस्य जयश्री भूमकर, संदीप खर्डेकर, सचिन मोरे,नगरसेवक प्रसन्न जगताप,सागर भूमकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT