Court Sakal
महाराष्ट्र बातम्या

ग्राहक आयोगातील प्रकरणेही आता पुन्हा लोकअदालतीत ठेवता येणार

तडजोड आणि चर्चेतून तक्रारी निकाली निघाव्यात यासाठी आता पुन्हा ग्राहक आयोगातील दावे लोकअदालतीत ठेवले जाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तडजोड आणि चर्चेतून तक्रारी निकाली निघाव्यात यासाठी आता पुन्हा ग्राहक आयोगातील दावे लोकअदालतीत ठेवले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहक आयोगात प्रलंबित असलेले दावे लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली निघण्यास मदत होणार असून त्यामुळे सुनावणी सुरू असलेल्या तक्रारींची संख्या कमी होणार आहे. तसेच तक्रारदारांच्या वेळ आणि पैशाची बचत होण्यास मदत होईल.

राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत १२ मार्च रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तडजोडीची शक्यता असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी त्यात ठेवता येवू शकणार आहेत. अनेक वर्षांनंतर ग्राहक आयोगात लोकअदालत आयोजित करण्यात येत आहे. न्यायिक अधिकार क्षेत्राच्या कारणावरून आयोगात लोकअदालत भरविण्याची प्रक्रीया थांबविण्यात आली होती.

आयोगात लोकअदालत आयोजित करायची की नाही याबाबत असलेल्या शंका दूर झाल्यानंतर आता पुन्हा येथे लोकअदालत भरविण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे तडजोडीची इच्छा असलेले तक्रारदार आणि विरोधात तक्रार दाखल असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांना त्यांचा दावा त्वरित निकाली काढता येणार आहे.

हा निर्णय स्वागर्ताह आहे. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा लोकअदालतील ग्राहक आयोगातील तक्रारी ठेवता येणार आहेत. त्यामुळे प्रलंबित तक्रारी निकाली काढण्यात मदत होणार आहे. तडजोडीस शक्य असलेल्या जास्तीत जास्त तक्रारी लोकअदालतीत ठेवण्याबाबत २८ फेब्रुवारी रोजी आयोगाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारदार ग्राहकांनी त्यांनी प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीत ठेवावीत.

-ॲड. ज्ञानराज संत, उपाध्यक्ष , कन्झ्युमर ॲडव्होकेट्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT