Punyashlok Ajilyadevi Holkar solapur univercity Esakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यापीठात ऑगस्टमध्ये कंत्राटी पदभरती! नव्या सेवा पुरवठादारासाठी काढले टेंडर; ‘एवढी’ पदे भरली जाणार, सध्या १२८ कंत्राटी शिक्षक भरले, वाचा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुढील महिन्यात सुमारे १५० कंत्राटी पदांची भरती होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने नव्या सेवा पुरवठादारासाठी निविदा मागविली असून, त्याची निवड झाल्यानंतर ही पदभरती केली जाणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुढील महिन्यात सुमारे १५० कंत्राटी पदांची भरती होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने नव्या सेवा पुरवठादारासाठी निविदा मागविली असून, त्याची निवड झाल्यानंतर ही पदभरती केली जाणार आहे.

सोलापूर विद्यापीठातील परीक्षा, आस्थापना, वित्त, शिक्षक मान्यता विभागांसह ११ संकुलांमध्ये दरवर्षी ११ महिन्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. यात शिपाई व लिपिक आदी पदांचा समावेश असतो. २०२५-२६ या वर्षासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादाराची मुदत संपल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

शिपाई व लिपिक पदांसाठी चांगले मानधन मिळत असल्याने पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवारही अर्ज करतात. अर्जदारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड केली जाते. सध्या पूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले असून, पुढील दहा दिवसांत सेवा पुरवठादाराची निवड होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विभागांच्या गरजेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

१२८ कंत्राटी शिक्षकांचीही निवड

विद्यापीठातील ११ संकुलांमध्ये सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या अध्यापनासाठी १२८ कंत्राटी शिक्षकांच्या मुलाखती घेऊन पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ दिवसांनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड करून दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. या शिक्षकांना दरमहा २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. उच्च शिक्षण विभागाकडून वाढीव पदांना मान्यता नसल्याने या कंत्राटी शिक्षकांचा आर्थिक भार विद्यापीठालाच उचलावा लागत आहे.

कंत्राटी पदभरती लवकरच सुरु होईल

विद्यापीठातील विविध संकुले व विभागांच्या मागणीनुसार दरवर्षी कंत्राटी पदे भरली जातात. त्यासाठी बाह्य सेवा पुरवठादाराची निविदा प्रक्रियेद्वारे निवड केली जाते. यंदाची निविदा प्रसिद्ध झाली असून, काही दिवसांत सेवा पुरवठादार अंतिम होईल. त्यानंतर कंत्राटी पदभरती सुरू केली जाईल.

- अतुल लकडे, कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविकही भारावले, पाहा खास फोटो

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

SCROLL FOR NEXT