Balasaheb Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thackrey : ठाकरे गटाच्या आमदारांची नाराजी म्हणाले, बाळासाहेबाचे चित्र...

विधीमंडळात बसवण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून वाद पेटण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

विधीमंडळात बसवण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून ठाकरे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केलीय. बाळासाहेबांची तैलचित्रे अजून चांगली बनवता आली असती, असं म्हणत ठाकरे गटाने तैलचित्रावर आक्षेप घेतलाय. याबाबत ठाकरे गटाचे आमदार सभापती, विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव राज्याच्या राजकारणासह देशभर घेतलं जात. राजकारणात अनेक महत्वाच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. पण त्यांनी कधीही राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नाही. मात्र राजकारणातल्या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्याचं हे तैलचित्र विधीमंडळात लावण्यात येणार आहे.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

येत्या 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने विधीमंडळात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी एकत्र बांधलेली शिवसेना 6 महिन्यांपूर्वी फुटली आणि शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. या दोन गटांमध्ये शिवसेना कोणाची यावरून जुंपली आहे. हा वाद सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन पोहचला आहे.

तर या तैलचित्र बसवण्याच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्रित दिसण्याची शक्यता होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT