jalna jalna
महाराष्ट्र बातम्या

भाजपचं आंदोलन फसलं! राऊतांचा ताफा अडवून टोपेंविरोधात घोषणाबाजी

पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा प्रकार शनिवारी (ता.१२) घडला आहे

उमेश वाघमारे

जालना: तालुक्यातील उटवद येथील उपकेंद्राच्या भूमिपूजनासाठी निघालेल्या ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) ताफ्याला भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवित, आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा प्रकार शनिवारी (ता.१२) घडला आहे.

नेर येथे १३२ केव्ही उपकेंद्राचे उपकेंद्राचे भूमिपुजन झाले होते. नेर येथील १३२ केव्हीचे उपकेंद्र उटवद येथे पळविण्याचा प्रयत्न पालमंत्री राजेश टोपे यांनी केल्याचा आरोप भाजप आमदार बबनराव लोणीकर केला आहे. दरम्यान उटवद येथील उपक्रेंद्रचे भूमिपुजन ऊर्जामंत्री नितीन राऊत, आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे हे शनिवारी (ता.१२) यांच्या हस्ते झाले.

मात्र, नेर येथील उपक्रेंदाचे काम उटवद येथे पळविल्याचा आरोप करत उटवद येथे उपकेंद्रांच्या भूमिपुजनासाठी निघालेल्या उर्जामंत्री नितीन राऊत यांचा भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता.१२) उटवद फाटा येथे ताफा अडवून काळे झोंडे दाखविले. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात घोषाणाबाजी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT