Cooking pm modi scheme Ujjwala on the stove due high gas prices solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

गॅस महागल्याने ‘उज्ज्वलां’चा चुलीवर स्वयंपाक

अंशदान केवळ एक ते पाच रुपये; लाभार्थ्यांची संख्या सव्वासात लाखांची घटली

तात्या लांडगे

सोलापूर : रेशन धान्य दुकानातून २०१४ पासून केरोसिन मिळणे बंद झाले. रॉकेलमुक्‍त देशातील अनुसूचित जातीसह अन्य विविध घटकांमधील सर्वसामान्य महिलांसाठी ‘उज्ज्वला’ योजना आणली. त्याअंतर्गत सध्या राज्यभरात ४६ लाख ८३ हजार २६१ लाभार्थी आहेत. दरमहा त्यांना एक गॅस सिलिंडर मिळतो. सुरुवातीला दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत मिळणारे अंशदान आता एक ते पाच रुपयांवर आले आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढत असतानाही अंशदान मात्र कमी झाले. त्यामुळे जवळपास सव्वासात लाख ‘उज्ज्वला’ पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत.

हातावरील पोट असलेल्या महिलांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेतून दररोज रोजगार शोधावा लागतो. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांमध्ये डोळ्याचे विकार वाढले. त्यामुळे केंद्र सरकारने त्या महिलांना वर्षात १२ गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अंशदान अधिक मिळत असल्याने कनेक्‍शनची संख्या भरमसाठ वाढली. मात्र, अंशदान टप्प्याटप्याने कमी करण्यात आले. तीनशे रुपयांपर्यंत मिळणारे अंशदान मागील काही वर्षांत अवघ्या पाच रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळे पुन्हा सरपणाची ‘चूल’च बरी असा सूर त्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचा आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार

उज्वला असो वा अन्य नियमित ग्राहकांना दरमहा गॅस सिलिंडर दिला जातो. घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू नये म्हणून त्याच्या वापरावर कडक निकष लादण्यात आले. इंधन अथवा कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी घरगुती गॅस सिलिंडर वापरल्यास पोलिसांत गुन्हा दाखल केला जातो. पण, दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने बहुतेक ग्राहक दोन महिन्यातून एकदा किंवा वर्षातून आठ सिलिंडर घेतात. उर्वरित चार सिलिंडर चढ्या दराने इंधनासाठी तथा व्यवसायिकांना दिले जातात, हे पोलिस कारवाईतून उघड झाले आहे.

साडेतीनशे रुपयांचा गॅस सिलिंडर एक हजारांवर पोहचला आहे. इंधन वाढल्याने खतांच्या किंमतीही वाढल्या, वाहतूक खर्च वाढला. उज्ज्वला गॅस योजनेतून सिलिंडर घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. महागाई कमी होण्यासाठी जनतेने एकत्रित यायला हवे.

- छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठा मंत्री

‘उज्ज्वला’ योजनेची स्थिती

  • ९५० ते १००० - गॅस सिलिंडरची किंमत

  • ४६,८३,२६१ - एकूण लाभार्थी

  • १ ते ५ रुपये - उज्ज्वलाचे अंशदान

  • ७.२५ लाख - अंदाजित कनेक्‍शन बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT