Corona-test-maha
Corona-test-maha 
महाराष्ट्र

गूड न्यूज ! अर्ध्या महाराष्ट्रातून हद्दपार होतोय कोरोना; 'या' 16 जिल्ह्यांतील स्थिती

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारने लॉकडाउन शिथिल केल्यानंतर 22 मे ते 18 जूनपर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तब्बल 72 हजाराने भर पडली. दररोज सरासरी साडेतीन हजार रुग्णांची भर पडत असतानाच राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मात्र, 15 दिवसांत 629 रूग्ण सापडले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात येत असून सद्यस्थितीत अवघे 535 रुग्ण उपचार घेत आहेत. परभणी, वर्धा, गडचिरोली हे जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आले आहेत. जिल्हाबंदीमुळे कोरोनाला रोखण्यात यश मिळू लागले आहे. 


कोरोनाचे वैश्‍विक संकट दूर करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने 22 मार्चपासून लॉकडाउन सुरु केले. या कालावधीत कमी-अधिक प्रमाणात रुग्णांची भर पडत होती. लॉकडाउननंतरही कोरोनाचा संसर्ग रोखण्यात शक्‍य तितके यश प्राप्त झाले नाही. मात्र, समाधानकारक बाब म्हणजे नागरिकांना सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता याचे महत्त्व समजले. नागरिकांना त्याची सवय झाली आणि राज्य सरकारने लॉकडाउन शिथिल केला. तर दुसरीकडे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींना वेळेत ताब्यात घेऊन उपचार केल्याने रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला आहे. परंतु, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सोलापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अकोला, नागपूर या जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढीचा वेग अधिक आहे. तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, धुळे, जालना आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर संबंधित जिल्ह्यातील प्रशासन कोरोनाला हद्दपार करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करीत आहे. या जिल्ह्यांमधील विषाणूची साखळी खंडीत करण्यासाठी शेजारील जिल्ह्यांच्या सीमांवर कडक लक्ष ठेवणे आणि प्रतिबंधित क्षेत्रात काटेकोर नियोजन करणे, या दोन पर्यायातून यश मिळेल असा विश्‍वास अनेकांनी व्यक्‍त केला आहे. 

16 जिल्ह्यांमधील संसर्ग येतोय आटोक्‍यात 
लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर राज्यात दररोज सरासरी तीन हजार 330 हून अधिक रुग्ण नव्याने सापडत आहेत. मात्र, राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मागील 15 दिवसांत अवघे 629 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर उर्वरित 19 जिल्ह्यांमध्ये 42 हजार 73 रुग्णांची भर पडली आहे. 5 ते 18 जूनपर्यंत राज्यात 42 हजार 702 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या एक लाख 20 हजार 504 झाली आहे. दुसरीकडे राज्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या 53 हजार 901 एवढी असून या 16 जिल्ह्यांमध्ये आता 535 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये सिंधुदूर्ग (59), नगर (45), नंदूरबार (33), बीड (24), लातूर (61), परभणी (6), हिंगोली (47), उस्मानाबाद (30), वाशिम (54), बुलढाणा (53), यवतमाळ (63), वर्धा (5), भंडारा (17), गोंदिया (32), चंद्रपूर (27) व गडचिरोली (9) या जिल्ह्यांचा समावेश आहे. 


ठळक बाबी... 

  • राज्यातील एक लाख 20 हजार 504 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा 
  •  एकूण बाधित रुग्णांपैकी तब्बल 60 हजार 838 व्यक्‍तींची कोरोनावर यशस्वी मात 
  • 53 हजार 901 रुग्ण देत आहेत कोरोनाशी लढा: पाच हजार 751 जणांची झूंज ठरली अपयशी 
  • शासकीय 58 तर 43 खासगी लॅबद्वारे सात लाख 18 हजार संशयितांच्या झाल्या कोरोना टेस्ट 
  • रुग्ण दुपटीचा वेग 25.9 दिवसांवरुन होतोय कमी: दररोज तीन हजार 300 हून अधिक वाढ 
  • कोरोना रुग्णांसाठी 92 हजार 141 खाटांची उपलब्धता: 16 जिल्ह्यांमध्ये अवघे 535 रुग्ण 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT