महाराष्ट्र बातम्या

Coronavirus: मुंबईतील मृतांची संख्या शंभरच्या वर;राज्यात ३५२ नवीन रुग्ण

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्राच्या कोरोनाचा केंद्र ठरलेल्या मुंबईत मृतांच्या संख्येने आज शंभरचा टप्पा पार केला. आज राज्यात ३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २,३३४ झाली आहे. आज राज्यात ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ९ आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा भाईंदर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. 
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज झालेल्या मृत्यूंपैकी ४ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या ११ मृत्यूपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १६० झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४३,१९९ नमुन्यांपैकी ३९,०८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २३३४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आज राज्यातून २२९ कोविड १९ रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

काल सोलापूरात पहिला कोरोनाबाधित मृत्यू झाल्यानंतर तेथील आरोग्ययंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून या रुग्णाच्या निवासी परिसरात ३५,००० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यासाठी ६२ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. या बाधित रुग्णाच्या अतिजोखमीच्या निकटवर्तीयांचा शोध घेण्यात येत असून आतापर्यंत ७९ जणांना विलग करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

Latest Marathi News Live Update: शेतातील सुपीक मातीची चोरी, तक्रार दाखल

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

SCROLL FOR NEXT