महाराष्ट्र बातम्या

Coronavirus राज्यात कोरोनाचा पहिला बळी 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यात कोरोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे. कोरोनाचा प्रसार सामूदायिक संसर्ग होऊ नये, म्हणून खबरदारीच्या उपाययोजना राज्य सरकारने घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कोरोनामुळे राज्यातील पहिला बळी मुंबईत गेला आहे. उपचार सुरू असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा आज मृत्यू झाला. तसेच मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथे प्रत्येकी एका नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४१ झाली आहे. 

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ६४ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. हे ज्येष्ठ नागरिक दुबईहून पाच मार्चला परतले होते. त्यांना उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. त्यांना हिंदूजा रुग्णालयातून संदर्भित करण्यात आले होते. 

राज्यात आज आणखी दोन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यापैकी एक रुग्ण मुंबईचा असून हा ४९ वर्षांचा प्रौढ सात मार्च रोजी अमेरिकेवरून परतला आहे. तर दुसरा रुग्ण हा पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात भरती असून, हा २६ वर्षीय तरुण १४ मार्च रोजी अमेरिकेहून परतला आहे. राज्यात आज १०५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण ११६९ प्रवासी आले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आत्तापर्यंत ९०० जणांना भरती करण्यात आले आहे. यापैकी ७७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ४१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

दरम्यान, नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ पथकाने काल आणि आज पुणे येथे भेट देऊन येथील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहितीही टोपे यांनी दिली. 

राज्यातील रुग्ण 
पिंपरी चिंचवड मनपा १० 
पुणे मनपा ७ 
मुंबई ७ 
नागपूर ४ 
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी ३, 
रायगड, ठाणे, नगर, औरंगाबाद येथे प्रत्येकी १ 
एकूण ४१ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Timber Transport Bribe : सागवान वाहतुकीसाठी लाच; तिघे जाळ्यात कंत्राटी संगणक ऑपरेटरला रंगेहात पकडले; जुन्या घराच्या लाकडासाठी मागितले पैसे

WCL Officer Bribe Case : बिलासाठी मागितली ५० हजारांची लाच डब्ल्यूसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयच्या जाळ्यात

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार पडळकर, खाडेंसह ६४ अर्ज दाखल; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Sangli Crime : सांगली हादरली! गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; 'शिवप्रतिष्ठान युवा'च्या तत्परतेने इम्रानवर गुन्हा, आणखी 20 महिला जाळ्यात अडकल्याचा दावा

SCROLL FOR NEXT