102Child_Mask_0_20_20Copy_3.jpg
102Child_Mask_0_20_20Copy_3.jpg 
महाराष्ट्र

नऊ जिल्ह्यांमध्येच वाढतोय कोरोना ! राज्यात 17 दिवसांत वाढले 48 हजार रुग्ण

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यभरात लस आल्यानंतर नियमांचे उल्लंघन वाढू लागले आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नगर, जळगाव, अमरावती, सातारा, बुलढाणा, नागपूर या नऊ जिल्ह्यांमध्ये संसर्ग पुन्हा जोर धरु लागला आहे. मागील 16 दिवसांत राज्यभरात 47 हजार 746 रुग्ण वाढले असून त्यात या नऊ जिल्ह्यांमधील 33 हजार 952 रुग्णांचा समावेश आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यातही या काळात 845 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर रस्ता सुरक्षा सप्ताह समारोपासह अन्य नियोजित शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.


शाळांमधील विद्यार्थी सुरक्षित 
23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले असून 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. राज्यभरातील 70 हजारांहून अधिक शाळांमध्ये 30 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. दहावी- बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अनेक शाळांनी या वर्गातील 100 टक्‍के विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याचे बंधनकारक केले आहे. तरीही अद्याप राज्यभरातील विद्यार्थी कोरोनापासून सुरक्षित असून त्यासंदर्भात दररोज शालेय शिक्षण विभागाकडून आढावा घेतला जात आहे. 

अनलॉक केल्यानंतर राज्यभरात आंदोलने, निर्दशने, सभा, सार्वजनिक कार्यक्रमांचा जोर वाढला. लग्नासाठी 50 व्यक्‍तींची मर्यादा असतानाही अनेक ठिकाणी दोनशेहून अधिक व्यक्‍तींची गर्दी पहायला मिळत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवरुन अनेक आंदोलने होऊ लागली आहेत. लस आल्यानंतर कोरोना हद्दपार होईल, अशी आशा असतानाही कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय तर दुसऱ्या टप्प्यात आता फ्रंटलाईनवरील कर्मचाऱ्यांना लस टोचली जात असून मार्चपासून 30 वर्षांवरील को- मॉर्बिड रुग्णांना लस दिली जाणार आहे. मात्र, सर्वसामान्यांना लस कधी मिळेल, हे अद्याप आरोग्य विभागातील कोणताही वरिष्ठ अधिकारी ठामपणे सांगू शकत नाही. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करायलाच हवे, अशा सूचना आणि तसे आदेश संबंधित जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांनी काढायला सुरवात केली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हात स्वच्छ धुवा, असे आवाहन सातत्याने केले जात आहे.

जिल्हानिहाय रुग्णवाढ (1 ते 16 फेब्रुवारी) 
जिल्हा       1 फेब्रुवारीचे रुग्ण    सध्याची रुग्णसंख्या     रुग्णांची वाढ 
मुंबई          3,09,303             3,15,751                6,448 
ठाणे          2,68,950              2,73,731                 4,781 
पुणे            3,88,766             3,96,571                 7,805 
जळगाव        57,439                58,248                   809 
नगर             72,099                73,430                 1,331 
अमरावती      22,260                27,141                 4,881 
सातारा          56,515                57,639                 1,124 
बुलढाणा        14,987               16,008                  1,021 
नागपूर       1,36,135               1,41,887                5,752 
एकूण       13,26,454             13,60,406               33,952

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT