uddhav thackeray and raj. 
महाराष्ट्र बातम्या

मास्क न वापरण्यात कसलं शौर्य; नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आपल्या संबोधनात या बोलतील याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सध्यातरी राज्यात लॉकडाऊन करणार नसल्याचं म्हटलं आहे. पण, येत्या काळात निर्बंध अधिक कठोर करण्यात येतील असं ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. अनेकजण मास्क लावत नाहीयेत. मास्क न लावण्यात काय शौर्य आहे, मी मास्क वापरत वाही, वापरणार नाही. मास्क न वापरण्यात कसली आलीये शूरता. तसेच मास्क लावण्यात लाजण्याचे कारण नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना माध्यमांनी मास्क का वापरत नाही, असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना त्यांनी मी मास्क वापरत नाही, कधीही वापरला नाही, असं म्हटलं होतं. 

लस घेतली म्हणजे आता कोरोना होणार नाही अशातही भाग नाही. कोरोना होईल, फक्त त्याची सक्रियता कमी असेल, विषाणू कमी घातक ठरेल. लस घेतल्यानंतरही मास्क लावणे आवश्यक आहे, अंतर ठेवलंच पाहिजे हात धुत राहिलंच पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. लस घेणं, टेस्ट वाढवणं, चाचण्या वाढवणं हा उपाय अजून तरी मी मानायला तयार नाही. रुग्णवाढ थांबवण्यासाठी अजून कोणी उपाय सांगत नाहीय. संपूर्ण देशात आपलं राज्य हे लस देणारं नंबर एकचं राज्य आहे. लसीचा पुरवठा जास्त होईल तेव्हा ही क्षमता आपण दुप्पटीने लस देऊ शकतो, असंही ते म्हणाले. .

मनुष्यबळ कुठून आणणार

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर सुविधा अपुऱ्या पडतील. सुविधा वाढवण्याचे आदेश दिले आहेत.  साधने वाढली तरी मनुष्यबळ कुठून आणणार असा प्रश्न आहे. याचीच चिंता मोठी आहे. डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बरं झाल्यानंतर त्यांची कार्यक्षमता थोडी कमी होते. त्यांना थकवा आलेला असतो आणि आरामाची गरज असते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT