Corona And Omicron Update Marathi News sakal
महाराष्ट्र बातम्या

Corona: राज्यात कोविडबाधित रुग्णांमध्ये वाढ सुरूच

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात आज दैनंदिन बाधित रुग्णांचा आकडा कालच्या तुलनेत वाढला असून आज 43,697 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 73,25,825 झाली आहे.आज पुन्हा एकदा मुंबई,नाशिक,पुणे,पुणे मनपा,पिंपरी चिंचवड मनपा परिसरात अधिक रुग्ण आढळले. 

राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज 46,591 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 69,15,407 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 94.4 % एवढे झाले आहे.    राज्यात 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,41,934 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.93 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.औरंगाबाद,अकोला मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 30,नाशिक 2, पुणे 12,कोल्हापूर 3,लातूर 1,नागपूर 1 मृत्यू नोंदवले गेले.

सध्या राज्यात 23,93,704 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 2,64,708 इतकी झाली आहे. 

राज्यात 214 ओमिक्रॉन बाधीत

आज राज्यात 214 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली.पुणे मनपा 158,मुंबई 31,पुणे ग्रामीण 10,कल्याण डोंबिवली मनपा व पिंपरी चिंचवड प्रत्येकी 4,परभणी 2,नाशिक-विसर विरार,औरंगाबाद, जळगाव व इतर राज्य प्रत्येकी 1 रुग्णांची नोंद झाली. 

आजपर्यंत राज्यात एकूण 2074 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत.यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

आज सापडलेल्या बाधितांपैकी 100 रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था,68 रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय तर 46 रुग्ण राष्ट्रीय कोशिका विद्यान केंद्र यांनी कळवले आहेत. एकूण रुग्णांपैकी 2074 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत 5405  प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 89 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT