Corona JN1 Virus esakal
महाराष्ट्र बातम्या

Corona JN1 : कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नवीन व्हेरियंटचा रुग्ण राज्यात आढळला

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नवीन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नवीन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोरोना रुग्णांसाठी चार हजार ७०० खाटांची व्यवस्था केली आहे. त्यात विलगीकरणापासून ते व्हेंटिलेटरपर्यंतच्या खाटांचा समावेश आहे.

राज्यात ‘जेएन.१’ या नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. यात शहरातील उपलब्ध आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या बाबत माहिती देताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकाते म्हणाले, 'शहरात कोरोनाचा एकच रुग्ण आढळला आहे.

त्याचीही प्रकृती स्थिर असून, तो घरातच विलगीकरणात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शहरात नवीन व्हेरियंटचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांपर्यंत पोचून त्याची कोरोना चाचणी करणे आणि त्यांना उपचार देणे याला प्राधान्य दिले आहे.’’

मॉकड्रिक केलेली रुग्णालये

  • रुग्णालये - संख्या

  • सरकारी रुग्णालये - ११

  • खासगी रुग्णालये - ९३

  • खासगी वैद्यकीय महाविद्यालये - २

खाटांची व्यवस्था

  • विलगीकरण कक्षातील खाटा - १,३०१

  • ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा - २,२९६

  • अतिदक्षता विभागातील खाटा - ६७४

  • व्हेंटिलेटर असलेल्या खाटा - ४२९

मनुष्यबळ

  • डॉक्टर - २,४४२

  • कोरोनासंदर्भात प्रशिक्षित डॉक्टर - १,४८२

  • उपलब्ध परिचारिका - ३,८४४

  • प्रशिक्षित परिचारिका - २,२४९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहनचालकांसाठी मोठी बातमी! 1 वर्षात पाचवेळा वाहतूक नियम मोडला तर आता वाहन थेट ‘ब्लॅकलिस्ट’; वाहन परवानाही होणार निलंबित; केंद्राचे नवे राजपत्र, वाचा...

Raj Thackeray: बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा बाजार: मनसे प्रमुख राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात, डॉक्टराने पक्ष बदलला की काय?

Solapur Tirupati flight: सोलापूर-तिरुपती विमानसेवेस पुण्याचा अडथळा; पुणे विमानतळावर स्लॉट मिळेना, स्टार कंपनीकडून सोलापुरात चाचपणी!

Accident News: कंटेनरच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू; कोपरगाव तालुक्यातील घटना, गुरुत्व शाळेत निघाला अन् अचानक थरकाप उडाला!

Bread Pakora Bites Recipe: चहासोबत परफेक्ट! वीकेंडला झटपट तयार होणारे ब्रेड पकोडा बाइट्स, सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT