Corona latest update nine JN 1 Covid cases reported in Maharashtra Marathi news  
महाराष्ट्र बातम्या

Corona Latest Update : ठाण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे एकाच दिवशी पाच रुग्ण! राज्यात कुठे किती रुग्ण? वाचा

ठाण्यात जेएन.१ व्हेरियंटचे एकाच दिवशी पाच नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये ४ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे.

रोहित कणसे

Corona Latest Update : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत, यादरम्यान कोरोनाचा नवा सब व्हेरियंट जेएन.१ चे रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणी सापडत असल्याने चिंता वाढली आहे. यादरम्यान ठाण्यात जेएन.१ व्हेरियंटचे एकाच दिवशी पाच नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये ४ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे.

महत्वाची बाब म्हणजे , रविवारी दिवसभरात राज्यातजेएन.१ विषाणूचे तब्बल ९ रुग्ण आढळून आले आहेत. नव्या बाधित रुग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत ५, पुणे महापालिका हद्दीत ०२, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी १ रुग्णाची नोंद झाली. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी ८ आठ रुग्णांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

दरम्यान आढळलेल्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं असून सगळ्यांमध्ये जेएन.१ व्हेरिएंटचे तीव्र लक्षणं नसून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृतीत देखील सुधारणा होत असल्याचं राज्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. देशात कोरोनाच्या नवीन जेएन.१ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. तर राज्यात याचा पहिला रुग्ण सिंधुदूर्ग जिल्ह्यात आढळून आला होता. मात्र आता ठाणे आणि पुणे शहरात देखील या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढणल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाच्या रुग्णांमुले शहरातील कोरोना तपासण्या वाढवण्यात येत आहेत. तसेच सर्दी, खोकला, घसादुखी, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

सगळीकडे 'डाइनिंग विद द कपूर्स'ची चर्चा पण शोमधून आलिया भट्ट गायब; राज कपूर यांच्या नातवाने सांगितलं कारण

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Face Yoga Exercises: हिवाळ्यात चमकदार त्वचा हवी? मग रोज 'फेस योगा' करा!

SCROLL FOR NEXT