Corona in the Maharashtra is not the new strain 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील कोरोना नवीन स्टेन नाही

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात सध्या आढळून येणाऱ्या कोरोना विषाणूंचा नवीन प्रकार (स्टेन) नाही. आतापर्यंत आढळत असलेलाच हा विषाणू आहे, असा निर्वाळा बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांनी दिला. तसेच, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

राज्यात सध्या आढळणारे विषाणूंचा प्रकार हा ब्रिटनमधील आहे का, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझीलमधून आला आहे का, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात जनुकीय विश्लेषण करण्यात आले. त्यासाठी पुण्यातून १३ आणि यवतमाळ, अमरावती, सातारा येथून प्रत्येक चार असे एकूण २४ कोरोनाबाधीत रुग्णांचे नमुन्यांचे जनुकीय विश्लेषण करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आणि सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.

प्रमुख निष्कर्ष
- राज्यात सध्या सर्वत्र कोरोनाचा ‘डी६१४जी’ या प्रकारचा विषाणू सर्वत्र आढळत आहे. तोच विषाणू पुणे, सातारा येथील नमुन्यांमध्ये आढळला.
- नमुन्याची तपासणी केलेल्या कोणत्याच ठिकाणी ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील येथील जनुकीय बदल झालेला विषाणू आढळून आला नाही
- मात्र, अमरावती, यवतमाळ आणि सातारा या तीनही ठिकाणी थोड्याफार फरकाने वेगवेगळे बदल झाल्याचे विश्लेषणातून समोर आले.
- अमरावतीमधील चारही नमुन्यांमध्ये ‘ई४८४क्यू’ प्रकारचा विषाणू दिसला. हे चारही रुग्ण एकाच कुटुंबातील नव्हते. तरीही अमरावतीमधील चारही रुग्णांमध्ये एकाच प्रकारे बदललेला विषाणू दिसला. या प्रकारचा विषाणू माणसाच्या शरीरात असलेल्या अँटीबॉडीजपासून स्वतःचे संरक्षण करतो.
- यवतमाळमध्ये ‘एन४४०के’ हा प्रकारचा विषाणू येथे असल्याचे स्पष्ट झाले. आंध्र प्रदेशमध्ये सामान्यतः हा आढळतो. उत्तर भारतात नव्याने झालेल्या संसर्गात हा विषाणू महाराष्ट्रात आढळला नाही. त्यानुसार या विषाणूंमुळे परत संसर्गाची शक्यता वाढते.
- सातारा जिल्ह्यातील नमुन्यांमध्ये ‘व्ही९११आय’ हा विषाणू आढळला. परंतु, यामुळे नेमके काय होते, याचा संदर्भ अद्याप मिळाला नाही.


दोन दिवसांपासून जनुकीय अभ्यास सुरू केला. त्यासाठी अद्ययावत तज्ज्ञ मनुष्यबळ, मान्यताप्राप्त आणि अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा आहे. त्यामुळे विषाणूंचे जनुकीय विश्लेषण करणे शक्य झाले आहे.
- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

यवतमाळ, अमरावती आणि सातारा या तीनही ठिकाणी विषाणूंच्या जनुकीय रचना थोड्याफार फरकाने वेगळी आहे. मात्र, यात परदेशातून नव्याने बदल झालेल्या विषाणूंचा समावेश नाही.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, विभाग प्रमुख, सुक्ष्मजीव शास्त्र विभाग, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT