Corona update sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट; मृत्यू मात्र वाढले

मिलिंद तांबे

मुंबई : आज राज्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांसह (corona new patients) मृत्यूचा आकडा (corona deaths) कालच्या तुलनेत किंचित खालावला. आज 13,840 नवीन रुग्ण तर 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,42,940 इतका झाला आहे. आज राज्यात एकाही ओमिक्रॉन बाधित रुग्णाची (no omicron patient) नोंद झाली नाही. राज्यातील मृत्यूदर 1.83  टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मंडळात मृत्यूंची नोंद झाली नाही.ठाणे 21,नाशिक 3,पुणे 29,कोल्हापूर 5,औरंगाबाद 4 ,लातूर 9,अकोला 6,नागपूर 4 मृत्यू नोंदवले गेले. 

आज 13,840 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण संख्या 77,82,640 झाली आहे. राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज 27,891 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 74,91,759 इतकी आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 96.26 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 8,52,419 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,396 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 1,44,011 इतकी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT