Coronavirus Sakal
महाराष्ट्र बातम्या

Corona News: सहा महिन्यांनंतर कोरोनाने काढलं डोकं वर!

सकाळ डिजिटल टीम

Corona News: कोरोना संपला असे वाटत असतानाच सहा महिन्यांनंतर रविवारी (ता. पाच) पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. बजाजनगर परिसरातील चार वर्षीय मुलगी कोरोना बाधित असल्याचे समोर आले. या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

सुमारे तीन वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण राज्यात थैमान घातले होते. जवळपास कोरोनाच्या तीन लाटा आल्या. त्यात या आजाराने अनेकांनी आपले नातेवाईक गमावले होते. यानंतर गेल्या सहा महिन्यांत शहर किंवा परिसरात एकही कोरोना बाधित आढळून आलेला नाही. यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला होता. यादरम्यानच वाळूज परिसरातील बजाजनगरची सर्दीने त्रस्त असलेली चार वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आली.

तिला शनिवारी सायंकाळी उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ही चिमुकली कोरोनाबाधित आढळली. यानंतर ही माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ धाव घेतली. चिमुकली कोरोना बाधित असली तरी तिची प्रकृती स्थिर असून, तिला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या ती होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्या IAS अधिकाऱ्यासाठी ममतांनी PM मोदींचा आदेश धुडकावला, TMC हरताच दिला राजीनामा

Team India: वैभव सूर्यवंशीची भारतीय T20 संघात निवड, शुभमन गिलसोबत सलामी; महान क्रिकेटपटूने निवडला संघ

Maharashtra Female Foeticide Monitoring: कन्याभ्रूण हत्येवर लगाम : राज्य तपासणी व संनियंत्रण समितीवर आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची नियुक्ती

Pune Parvati Crime : पर्वतीतील नऊ वर्षीय मुलीवरीरील अत्याचारप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Maharashtra NPS Reform: राज्य शासनाचा मोठा निर्णय: सुधारित एनपीएसमुळे शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांना हमी निवृत्तीवेतन

SCROLL FOR NEXT