Corona sakal
महाराष्ट्र बातम्या

गावांमध्येच वाढतोय कोरोना! पंचसूत्री पाळा, धोका राहील कमी; सोलापूरसह ‘या’ १५ जिल्ह्यात जास्त रुग्ण

राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे व रायगड या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. सोलापूर, पालघर, सांगली, कोल्हापूर, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अकोला या जिल्ह्यात रुग्णसंख्या दोन अंकी झाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : अडीच-तीन महिने कोरोनामुक्त राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता शंभरीकडे वाटचाल करीत आहे. शहरात सध्या ४० तर ग्रामीणमध्ये २३ रुग्ण आहेत. विशेष बाब म्हणजे १० तालुक्यांतील २३ रुग्णांपैकी २२ रुग्ण गावांमध्येच आहेत. जिल्हा प्रशासनाने दरवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मतवैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, सांगोला व दक्षिण सोलापूर या नऊ तालुक्यातील शहरी भागात एकही रुग्ण नाही. पण, त्या तालुक्यांमधील गावांमध्ये १९ रुग्ण आहेत. पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात तीन तर शहरात एक रुग्ण आहे. दरम्यान, राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये सध्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आहेत.

त्यात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे व रायगड या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर दुसरीकडे सोलापूर, पालघर, सांगली, कोल्हापूर, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अकोला या दहा जिल्ह्यांमध्ये मार्चमध्ये एकअंकी असलेली रुग्णसंख्या आता दोन अंकी झाली आहे. बाजारपेठांमध्ये वाढलेली नागरिकांची गर्दी, मास्कचा वापर नाही आणि प्रतिबंधित लस टोचण्याकडे फिरवलेली पाठ, ही कारणे त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. अजूनही बऱ्याच व्यक्तींनी प्रतिबंधित लसीचा पहिला, दुसरा डोस घेतलेलाच नाही.

आरोग्य विभागाचा पंचसूत्रीवर भर

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटनंतर तिसरी लाट सौम्यच होती. प्रत्येक लाटेला थोपविण्यासाठी आरोग्य विभागाने पंचसूत्रीवरच अधिक भर दिला. त्यात ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट, व्हॅक्सिनेशन (लसीकरण) व मास्क या पाच बाबींचा समावेश आहे. आता कोरोना रुग्ण वाढत असतानाही अजून आरोग्य विभागाने टेस्टिंग वाढविलेले नाहीत. एखादा रुग्ण आढळल्यावर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचीच टेस्ट केली जात आहे. दररोज शहरातील सरासरी ७० तर ग्रामीणमधील ८० संशयितांचीच टेस्ट केली जात आहे.

प्रतिबंधित लसीकरण अन्‌ मास्क हवाच

शहरातील कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक होत आहेत. पण, रुग्ण वाढू नये म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. लक्षणे असल्यास पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वतः:हून टेस्ट करून घ्यायला हवी. प्रतिबंधित लस घेतल्यास धोका कमी होईल. रुग्ण वाढल्यास प्रतिबंधित उपाययोजना कराव्याच लागतील.

- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT