Corona patients esakal
महाराष्ट्र बातम्या

Corona: राज्यात रुग्णसंख्या वाढली; दिवसभरात 4,831 रुग्णांची नोंद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात मृत्यूचा आकडा शुक्रवारच्या तुलनेत कमी झाला असून आज 126 रुग्ण दगावले. शुक्रवारी 170 रुग्ण दगावले होते. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,37,226 इतका झाला आहे. नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर पुणे मंडळात मृत्यूचा झाला असून तेथे 59 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 17,नाशिक 18,कोल्हापूर 28, औरंगाबाद 1,लातूर 2 मृत्यू नोंदवले गेले. 

राज्यातील रुग्णासंख्येय काहीशी वाढ झाली असून आज दिवसभरात 4,831 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64,52,273 झाली आहे.राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी वाढून 51,821 इतकी झाली. तर आज दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असून आज 4,455 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62,59,906 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.02 % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,34,56,403 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,52,273 (12.07 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,92,530 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Company Collapse News : सकाळी उठताच एआय कंपनी झाली उद्धवस्थ; अपडेटने केला घोटाळा, उद्योजक महिलेचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट

MP: पगार हवाय? मग वेळेवर ऑफिसला या! मुख्यमंत्र्याचा कडक इशारा; १० ते ६ ड्युटी आता अनिवार्य!

Latest Marathi News Live Update : जालन्यात 21 धारदार तलवारींचा साठा जप्त

Video : राकेशने तन्वीला किस केल्यावर राखीचं धक्कादायक कृत्य ! "काय मूर्खपणा.." प्रेक्षक वैतागले

Jalgaon Missing Girl : भोंगऱ्या बाजारात नियतीने घडवून आणली भेट! 8 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा कसा लागला शोध? पोलिसांच्या चाणाक्ष बुद्धीची कमाल

SCROLL FOR NEXT