महाराष्ट्र बातम्या

माझ्या पतीला दाखल करून घ्या ओ....(VIDEO)

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : कोरोना निगेटीव्ह अहवाल आलेल्या एका व्यक्तीला पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांच्या पत्नीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले. मात्र जागा नसल्याचे सांगून या दांपत्यास कुंभारी येथील खासगी रुग्णालयात पाठविले, मात्र तिथेही जागा नसल्याचे कारण देत पुन्हा शासकीय रुग्णालयास जाण्यास सांगितले. दुपारी तीन वाजेपर्यंत हे दांपत्य शासकीय रुग्णालयाच्या बाहेर पायऱ्यावर बसून होते.

माझ्या पतीला दाखल करून घ्या हो...असा पत्नीचा आर्त टाहो एेकूण त्या ठिकाणी असलेल्या कोणालाही पाझर फुटला नाही. अखेर नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी पुढाकार घेऊन या रुग्णास विमा रुग्णालयात दाखल केले. दुसरीकडे जिल्हा व महापालिका प्रशासन आम्ही कोरोना नियंत्रित आणण्यासाठी किती प्रयत्न आहोत याची कागदे रंगविण्यात दंग झाले आहे. या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त दीपक तावरे यांच्याशी संपर्क साधला, पण प्रतिसाद मिळाला नाही.

म्हेत्रे नगरमधील रहिवासी असलेल्या व्यक्तीला ताप आल्यामुळे त्यांच्या पत्नीने सकाळीच शासकीय रुग्णालय गाठले. त्या ठिकाणी गेल्यावर, शासकीय रुग्णालय फुल्ल भरले आहे, त्यामुळे तुम्ही कुंभारीतील खासगी रुग्णालयात जा, असे सांगण्यात आले. त्या ठिकाणी जाण्यासाठी संबंधित महिलेने हजार रुपये मोजले आणि खास रिक्षा करून कुंभारीला गेल्या.
मात्र त्या ठिकाणीही त्यांची निराशा झाली. या रुग्णालयातही जागा फुल्ल झाल्याने तुम्ही शासकीय रुग्णालयातच जावा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आपल्या पतीला घेऊन
या महिला पु्न्हा शासकीय रुग्णालयात आल्या. त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या डॅाक्टरांना हात जोडून विनंती करत पतीला रुग्णालयात दाखल करून घेण्याची विनंती केली. मात्र कुणालाही काही वाटले नाही, त्यामुळे या महिला पतीसह रुग्णालयाच्या पायरीवरच बसून होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत हे दांपत्य बसून होते.

नगरसेवक बाबा मिस्त्री यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी तातडीने ड्युटीवर असलेल्या डॅाक्टरची गाठ घेतली आणि या ठिकाणी जागा नसेल तर विमा रुग्णालयात दाखल करून घेण्याची शिफारस करून मागितली. त्यानुसार डॅाक्टरांनी शिफारस करून दिली. त्यानंतर हे दांपत्य विमा रुग्णालयात गेले आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीला दाखल करून घेण्यात आले. दिवसभर झालेल्या या नाट्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. 


केगाव येथील क्वारंटाईनमध्ये चाचणी केल्यावर रिपोर्ट निगेटीव्ह आला. त्यामुळे त्यांना घरी सोडले. मात्र काल सोमवारी सायंकाळपासून त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने
पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे सकाळीच शासकीय रुग्णालयात आणले, पण कुणीही दखल घेतली नाही.
- रुग्णाची पत्नी

एकीकडे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त आम्ही रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा केल्या आहेत असा डांगोरा पिटत आहे. प्रत्यक्षात काही नाही. खासगी रुग्णालये अधिगृहीत करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी रुग्णांना दाखल करून घेतले नाही तर महापालिका आयुक्त शब्द दिल्याप्रमाणे कारवाई करणार का, हा खरा प्रश्न आहे. 
- बाबा मिस्त्री, नगरसेवक
 

माझ्या पतीला दाखल करून घ्या ओ....(VIDEO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT