Sindhudurg Corona News Updates sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात नवीन रुग्णांचा आकडा नियंत्रणात; 24 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात कोर नवीन रुग्णांचा (corona new patients) आकडा 6 हजारापर्यंत खाली आले असून आज 6,436 नवीन रुग्ण तर 24 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,43,098 इतका झाला आहे. आज राज्यात एकाही ओमिक्रॉन बाधित (omicron variant) रुग्णाची नोंद झाली नाही. राज्यातील मृत्यूदर 1.83  टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नाशिक मंडळात एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. ठाणे 10,पुणे 6,कोल्हापूर 1,औरंगाबाद 1,लातूर 1,अकोला 3,नागपूर 2 मृत्यू नोंदवले गेले. 

आज 6,436 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण संख्या 78,10,136 झाली आहे.राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज 18,423 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 75,57,034 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 96.76 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 6,73,575 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,383 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 1,06,059 इतकी झाली आहे. 

राज्यात नवीन ओमिक्रॉन बाधीत नाही

राज्यात आजही नवीन ओमिक्रॉन बाधीत रुग्णाची नोंद झाली नाही. आजपर्यंत राज्यात एकूण 3334 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी 2023 रुग्णांना त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.आजपर्यंत एकूण 7014 नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी 6901 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि 113 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT