Corona test of four lakh patients in Maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

अबब...! देशभरातील 33 लाख संशयितांच्या कोरोना टेस्टसाठी झाला 'एवढा' खर्च; निधी कमी पडतोय म्हणून...

तात्या लांडगे

सोलापूर : आतपर्यंत देशातील 32 लाख 50 हजार संशयित व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील चार लाख 10 हजार टेस्टचा समावेश आहे. नुसत्या टेस्टसाठी आतापर्यंत एक हजार 462 कोटींचा खर्च झाला आहे. दहा लाख लोकांमागे दोन हजार 363 व्यक्तींची टेस्ट केली जात आहे. राज्यांना या संकटाचा सामना करण्यासाठी निधी कमी पडू लागला असून केंद्राकडे मागणी करुनही तो पुरेसा मिळालेला नाही. त्यामुळे आता मागच्या वर्षीच्या अखर्चित निधीतून ही भागवाभागवी केली जात आहे.
केंद्र सरकारकडे पीपीई कीट व एन- 95 मास्कसह अन्य साधनांची मागणी कळविली आहे. मात्र, त्याचा टप्प्याटप्प्याने पुरवठा केला जात असून एकदम काहीच मिळालेले नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध करण्यासाठी काही जिल्ह्यांना रोख स्वरुपात तर काही सरकारी रुग्णालयांना वस्तूंच्या स्वरुपात मदत करण्यात आली आहे, अशी माहिती कुटुंब कल्याण विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली. तर प्रत्येक टेस्टसाठी साडेचार हजार रुपयांचा खर्च होतो, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रातील संशयित व्यक्तींच्या तपासणीसाठी सुमारे 180 कोटींचा खर्च झाला आहे. 

ठळक बाबी....

  • - महाराष्ट्रातील सुमारे 6 लाख लोक होम क्वारंटाईन असून 38 हजार जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • - राज्यातील 68 लाख लोकांचा सर्व्हे 17 हजार 119 पथकाद्वारे झाला पूर्ण
  • - राज्यातील चार लाख दहा हजारांहून अधिक व्यक्तींशी झाली कोरोना टेस्ट; रुग्णांची संख्या 57 हजारांच्या पुढे
  • - देशातील 32 लाख 50 हजारांहून अधिक व्यक्तींची कोरोना टेस्ट; पीपीई कीटसह अन्य खर्च पोहचला 30 हजार कोटींहून अधिक
  • - काही जिल्ह्यांना थेट सरकारकडून निधी तर काही ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातोय निधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

MPSC Student Agitation : टिळक चौकातील आंदोलनाकडे नेत्यांची पाठ; उणिवा दुरुस्त करा, पण पद्धत बदलू नका; विद्यार्थ्यांची भूमिका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT