Corona Update esakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यात JN.1 व्हेरियंटचे 10 रुग्ण; ठाणे, पुणे अन् अकोल्यात नव्या रुग्णांची नोंद

नऊ रुग्णांत पुण्यातील एका रुग्णाचा समावेश असून तो अमेरिकेतून आल्याची नोंद आहे. तसेच यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्ण आढळला होता.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : देशासह राज्यात पसरत चाललेल्या ‘जेएन.१’ या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रसार आणखी वाढत आहे. ‘जेएन.१’च्या नऊ रुग्णांची रविवारी नोंद झाल्याने आता राज्यात एकूण रुग्णांची संख्या १० झाली आहे. ठाणे, पुणे आणि अकोला या ठिकाणी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नऊ रुग्णांत पुण्यातील एका रुग्णाचा समावेश असून तो अमेरिकेतून आल्याची नोंद आहे. तसेच यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्ण आढळला होता. रुग्णांची लक्षण सौम्य असून ते उपचारातून बरे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, रविवारी ठाणे पालिका क्षेत्रात ५ रुग्ण, तर पुणे पालिका क्षेत्रात २, तर पुणे ग्रामीण क्षेत्रात १ आणि अकोला पालिका क्षेत्रात १ असे नऊ रूग्ण आढळले. यापैकी ८ पुरुष तर १ महिला आहे. यातील एक रुग्ण ९ वर्षांचा मुलगा असून २१ वर्षांच्या तरुणीलाही संसर्ग झाला आहे. तर एकजण २८ वर्षांचा तरुण असून उर्वरित सहा जण ४० वर्षांवरील नागरिक असल्याचे सांगण्यात आले.

यातील आठजणांनी कोरोना लस घेतली आहे. हे सर्वजण घरात विलगीकरणात असल्याचे सांगण्यात आले. सर्वांना सौम्य लक्षणे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT