Mahrashtra Sakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात 960 नवीन रुग्ण तर 41 रुग्णांचा मृत्यू

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.68 % एवढे झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मंगळवारच्या तुलनेत बाधित रुग्ण तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले. राज्यात 41 रुग्ण दगावले असून मंगळवारी 19 रुग्ण दगावले होते. दैनंदिन रुग्णसंख्या ही 766 वरून 960 झाली आहे. तर आज 1043  बाधित रुग्ण बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,78,422 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.68 % एवढे झाले आहे.

राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1,40,807 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 9366 इतकी आहे.आज 960 रुग्णांसह  करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,32,257 झाली आहे.    

कोल्हापूर,औरंगाबाद,लातूर, अकोला,नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 15,नाशिक 6,पुणे 20 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 84,261 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1084 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

जन्मठेप भोगणाऱ्या माजी खासदाराच्या फोनमध्ये १५० पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स, जेलमधून गर्लफ्रेंडला करायचा कॉल

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली

Baramati News: महिलेसोबतचे प्रेमसंबंध पतीला समजले, बारामतीत १९ वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT