maha_covid 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात दिवसभरात ९,८१२ नव्या रुग्णांची भर

बरे होण्याच्या रुग्णांच्या प्रमाणात किंचित घट

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात दिवसभरात ९,८१२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कालच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याने आणि बरे होण्याच्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याने रिक्वव्हरी रेटमध्ये घट झाली आहे. राज्याच्या आरोग्यविभागानं ही माहिती दिली आहे. (Corona Update 9812 new patients added in the maharashtra in a day)

आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, ज्यात आज ९,८१२ कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली तर नवीन ८,७५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात आजवर एकूण ५७,८१,५५१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण १,२१,२५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९५.९३ टक्के झाले आहे.

दरम्यान, मुंबईत चोवीस तासांत ६४८ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले. तर १९१९ रुग्ण दिवसभरात बरे झाले आहेत. त्यामुळे आजवर मुंबईतील बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६,९२,७८७ वर पोहोचली आहे. तसेच रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबई शहरात सध्या ९१४८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, रुग्ण दुपट्टीचा दर हा ७२३ दिवसांवर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT