महाराष्ट्र

Corona Update: दिलासादायक! राज्यात कोरोनामुक्तांची संख्या कोरोनाबाधितांहून अधिक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात मृतांचा आकडा वाढला असून आज 802 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबई मनपा 90 येथे सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून, सोलापूर मनपा 49, नागपूर मनपा 41,पुणे मनपा 39 येथे नोंदवण्यात आले. मृत्यूचा दर 1.49 % इतका आहे. नव्या रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा 60 हजाराच्या वर गेला असून आज दिवसभरात 63,282 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 46,65,754 झाली आहे. 

आज नोंद झालेल्या 802 मृत्यूंपैकी 438 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 178 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. तर 186 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,63,758 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,73,95,288 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 46,65,754 (17.03 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 40,43,899 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 26,420 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दिवसभरात 61,326 रुग्ण कोरोनामुक्त

आज 61,326 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 39,30,302 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.24 % एवढे झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT