Corona Update maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यात दिवसभरात ८७ कोरोना रुग्णांची नोंद, २ जणांचा मृत्यू

राज्यात ‘जेएन.१’ विषाणूच्या रुग्णाची नोंद बुधवारीही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. तर, दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्युदर १.८१ टक्के आहे.

सकाळ वृत्तसेवा

Corona Update: राज्यात बुधवारी दिवसभरात ८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यातील बाधितांची एकूण संख्या ८१,७२,२८७ झाली आहे. मंगळवारी १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ८०,२३,४५६ रुग्ण बरे झाल्याचे सांगण्यात आले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्क्यांवर गेले आहे. मुंबईत १९ रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्या ११,६४,१०८ झाली आहे.

दरम्यान, राज्यात ‘जेएन.१’ विषाणूच्या रुग्णाची नोंद बुधवारीही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. तर, दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्युदर १.८१ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,७५,८०,७८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,७२,२८७ (९.३३ टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी राज्यात १०,८६४ चाचण्या झाल्या. त्यांपैकी १९४९ आरटीपीसीआर आणि ८,९१५ आरएटी चाचणीची नोंद प्रयोगशाळेत करण्यात आली.

  • आतापर्यंत सक्रिय रुग्ण : १९४

  • गृहविलगीकरणातील रुग्ण : १६२ (८३.५%)

  • रुग्णालयात दाखल रुग्ण : ३२ (१६.५%)

  • आयसीयूमध्ये नसलेले रुग्ण : २५ (१२.९%)

  • आयसीयूमध्ये असलेले रुग्ण : ०७ (३.६%)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT