lockdown 
महाराष्ट्र बातम्या

Corona : दिलासादायक! राज्यातील रुग्णसंख्येला उतरती कळा; आज 139 जणांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाने डोकं वर काढलं आहे. त्यातल्या त्यात इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात आज कोरोनाचे नवे 27,918 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 27,73,436 वर पोहोचली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी महाराष्ट्रातील रुग्णांचा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात देशातील एकूण रुग्णांपैकी जवळपास 60 टक्के रुग्ण आढळून येताहेत. गेल्या रविवारी राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने तब्बल 40 हजारांचा आकडा पार केला होता. पण काल सोमवारी काही प्रमाणावर या रुग्णांच्या संख्यमध्ये घट झाली होती. सोमवारी महाराष्ट्रात 31,643 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते, तर 102 रुग्णांना मृत्यू झाला होता. अशात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 4 हजारांनी कमी झाल्याने थोडासा दिलासा मिळत आहे. 

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या इतक्या गतीने वाढली आहे की त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील निर्बंध कडक करण्यात आलेत. शिवाय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात 23,820 नव्या रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 23,77,127 वर पोहोचली आहे. राज्यात आज 139 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 54,422 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 3,40,542 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT