maha_covid 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात 5,787 नव्या रुग्णांची नोंद

134 कोरोना बाधितांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात दिवसभरात 5,787 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 63,87,863 झाली आहे. तर राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी कमी होऊन ती 63,262 इतकी झाली आहे.

दिवसभरात 5,352 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61,86,223 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.84 टक्के एवढे झाले आहे.

दरम्यान, राज्यात मृत्यूचा आकडा काहीसा कमी झाला असून आज 134 रुग्ण दगावले आहेत. शुक्रवारी 158 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली होती. औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. कोल्हापूर मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तेथे 45 मृत्यूची नोंद झाली. तर ठाणे 15, नाशिक 20, पुणे 44, लातूर 7, अकोला 2 व नागपूर मंडळात एक मृत्यू नोंदवला गेला. राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,34,909 वर पोहोचला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,07,59,767 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,87,863 (12.58 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,73,812 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 2,512 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

Manoj Jarange: प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील, मुख्यमंत्री किती द्वेष करतात; मनोज जरांगेंचा टोला

Menstrual Hygiene Day 2026: मासिक पाळीत स्वच्छता आणि आरोग्य जपण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टिप्स

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड संशयातून प्रियकराची कपड्यांच्या दुकानात घुसून प्रेयसीला बेदम मारहाण

Sangli Accident News : सांगलीचे नायब तहसीलदार दादासो पुकळेंची डॉक्टर मुलगीचे अपघाती निधन; कोकण पयर्टन बेतलं जिवावर

SCROLL FOR NEXT