corona sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्याला मोठा दिलासा! दिवसाच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

सक्रिय रुग्ण 50 हजारांच्या आत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज मोठा दिलासा मिळाला आहे. कारण दिवसभरात कोरोनाची नवी रुग्णसंख्या चार हजारांच्या खाली गेली आहे. तसेच सक्रीय रुग्णांच्या संख्येतही काहीशी घट झाली असून मृतांचा आकडाही घसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून चार ते सहा हजारांदरम्यान राहणाऱ्या या दररोजच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात 3,643 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64,28,294 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.05 टक्के झालं आहे. तसेच राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी कमी होऊन 49,924 इतकी झाली. मृतांचा आकडा ही कमी होऊन आज 105 पर्यंत खाली आला आहे. दिवसभरात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. आज 3,643 नवे रुग्ण सापडले तर 6,795 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62,38,794 इतकी आहे. 

राज्यात आज १०५ कोरोनाचे मृत्यू

राज्यात मृत्यूचा आज 105  रुग्ण दगावले. नागपूर, अकोला मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर पुणे मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तेथे 59 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 8, नाशिक 13, कोल्हापूर 14, औरंगाबाद 2, लातूर 9 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,36,067 वर पोहोचला आहे.

सुमारे अडीज हजार रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,24,45,689 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,28,294 (12.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,02,888 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर 2,487 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satellite Toll System : नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा झटका, सॅटेलाईट टोल टॅक्स कलेक्शन प्रोजेक्ट स्थगित; नेमकं कारण काय?

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज; महाराष्ट्राच्या गोलंदाजांची धुलाई

Property Law: आई असेपर्यंत आजोबांच्या मिळकतीत हिस्सा नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निकाल

Latest Marathi News Live Update : रायगडच्या महाडमध्ये दोन पक्षातील समर्थकांमध्ये तुफान राडा

लेकाच्या संगीत सोहळ्याला आदेश भाऊजींचा त्यांच्या होममिनिस्टरबरोबर धमाल डान्स

SCROLL FOR NEXT