corona sakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Upadate : राज्यात दिवसभरात 46,393 रुग्णांची नोंद

राज्यात सध्या २,७९,९३० अॅक्टिव्ह रुग्ण असून ते उपचार घेत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात कालच्या तुलनेत आज कोरोनाची रुग्णसंख्या (Corona patients) काहीशी कमी झाली आहे. दिवसभरात 46,393 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 30,795 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यात सध्या २,७९,९३० अॅक्टिव्ह रुग्ण असून ते उपचार घेत आहेत. (corona update maharashtra daily corona news)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात 46,393 रुग्ण आढळून आले आहेत तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 30,795 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यात आजवर 2,759 रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे. यांपैकी ४१६ नवे ओमिक्रॉनचे रुग्ण आज राज्यात आढळून आले आहेत.

राज्यातील मृत्यूदर 1.9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. औरंगाबाद, लातूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 21, नाशिक 4, पुणे 15, कोल्हापूर 5, अकोला 2, नागपूर 1 मृत्यू नोंदवले गेले. 

सध्या राज्यात 21,86,124 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 3,382 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 2,79,930 इतकी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Summer Heatwave : राज्यात उन्हाच्या झळा तापदायक! सोलापूर, सांगलीत उष्ण; उकाडा कायम राहणार

Asha Bhosle : स्वरनक्षत्र निमाले! आशा भोसले यांचे निधन, मुंबईत आज अंत्यसंस्कार

Chhatrapati Sambhajinagar: नवीन जल योजना ; चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मेनहोलचे काम पूर्ण; नक्षत्रवाडीत आज सायंकाळपर्यंत पाणी

Nashik IT Company Conversion Case: नाशिक धर्मांतर प्रकरणात खास मोड्यूल अन् फंडिंग? केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय चौकशी

SCROLL FOR NEXT