Maharashtra Corona  Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

COVID19 : राज्यात दिवसभरात ६,१२६ नव्या रुग्णांची नोंद

चोवीस तासात १९५ रुग्णांचा मृत्यू

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात दिवसभरात ६,१२६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर ७,४३६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोनाच्या प्रकरणांचा चढउतार अद्याप सुरुच असून ही आकडेवारी ६ ते ८ हजारांच्या दरम्यान वरखाली होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात राज्यात ६,१२६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर ८,४३६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ७२,८१० सक्रीय रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ६३,२७,१९४ लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

मुंबईतील कोरोना आकडेवारी

मुंबई शहरात दिवसभरात ३६३ नवे रुग्ण आढळले. तर ४३८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात ४५३० सक्रिय रुग्ण आहेत. तर गेल्या चोवीस तासात ९ मृत्यू झाले आहेत. मृतांपैकी ७ जणांना दीर्घ स्वरुपाचे आजार होते. दरम्यान, मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. तर कोरोना वाढीचा दर ०.०४ टक्के आहे. रुग्ण दुप्पटीचा दर १५९५ दिवसांवर पोहोचला आहे.

पुण्यातील कोरोना आकडेवारी

पुणे शहरात दिवसभरात २४९ नवे रुग्ण आढळून आले तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २,३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर २५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात ८,३१२ कोरोना चाचण्या पार पडल्या. दरम्यान, शहरात आजवर ८,७९२ कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायिक निर्णय पलटवले तर काय होईल? सुप्रीम कोर्टची थरारक चेतावणी! एका खटल्यातून संपूर्ण देशाला मोठा इशारा

कोच म्हणून ठेवायचं की नाही, ते BCCI ला ठरवू द्या! गौतम गंभीरचं विधान अन् बोर्डाने घेतला निर्णय, झाली का उचलबांगडी?

'ती' परत येतेय ! रीमा लागू यांनी गाजवलेलं नाटक 40 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर ; या अभिनेत्रीची मुख्य भूमिका

'आरएसएसला कोण फंडिंग करतं?' प्रश्नावर सीएम योगींनी दिलं उत्तर; सांगितल्या 'या' महत्त्वपूर्ण गोष्टी

What IS Gold Rate Today : सोन्याने सलग तिसऱ्या दिवशी घेतली उसळी, चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील १० ग्रॅमचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT