मुंबई, ता. 16 : राज्यात आज 3,663 रूग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 20,71,306 इतकी झाली आहे. राज्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 37,125 पर्यंत खाली आली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांवर राज्यभरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
राज्यात आज दिवसभरात 2,700 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 19,81,408 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर 95.66 टक्के इतका आहे. आज राज्यात 39 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा 51,591 इतका झाला आहे. राज्यात मृतांचा दैनंदिन आकडा वाढत असल्याने मृत्यूदर 2.49 इतका झाला आहे.
महत्त्वाची बातमी : पुन्हा कडक लॉकडाऊन ? "नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज झालेल्या मृत्यूंमध्ये ठाणे परिमंडळ 11, पुणे 6 ,नाशिक 5, कोल्हापूर 2,औरंगाबाद 0, लातूर मंडळ 0, अकोला मंडळ 8, नागपूर 7 आणि इतर राज्य 0 येथील मृत्यूंचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या 39 मृत्यूंपैकी 17 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत. 22 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,53,96,444 नमुन्यांपैकी 20,71,306 ( 13.45 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1,82,970 लोकं होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,726 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
corona update from maharashtra 3 thousand 663 new covid patients detected from maharashtra
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.