corona update india 
महाराष्ट्र बातम्या

Corona : राज्यात आज 40 हजारहून अधिक रुग्ण; मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे संकेत

सकाळवृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या संक्रमणामुळे चिंतेची परिस्थिती उद्भवली आहे. नुकत्याच हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र राज्यात आज 40,414 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच आज नवीन 17,874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 23,32,453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3,25,901 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.95% झाले आहे. राज्यात आज 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कोविड टास्क फोर्समधील पदाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक बैठक आज रविवारी पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना लॉक़डाउनच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. जर कोरोनाला रोखण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून अशाचप्रकारे उल्लंघन होत राहिले तर राज्यात लॉकडाउन सदृश निर्बंध लादावेत लागतील असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील परिस्थिती

  • आजवरचे एकूण रुग्ण: 2,71,3875
  • आजवर बरे झालेले एकूण रुग्ण: 2,33,2453
  • ऍक्टीव्ह रुग्ण: 3,25,901
  • आजवरचे एकूण मृत्यू: 54,181

महाराष्ट्रातील मुख्य शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईमध्ये आज कोरोनाचे नवे 6,923 रुग्ण सापडले आहेत. तर शहरात 8 मृत्यू झाले आहेत. या नव्या रुग्णांसह मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ही 3,98,674 वर पोहोचली आहे तर आजवर एकूण 11,649 मृत्यू झाले आहेत. नागपुर शहरात आज नवे 3,970 रुग्ण आढळले आहेत. तर 3,479 रुग्ण बरे झाले आहेत. 58 मृतांहस नागपूरमधील आजवरच्या मृतांची संख्या ही 4,931 वर पोहोचली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT