corona update maharashtra reports 1134 new covid 19 cases highest in last 3 months
corona update maharashtra reports 1134 new covid 19 cases highest in last 3 months  
महाराष्ट्र

कोरोना पुन्हा वाढतोय, सलग तिसर्‍या दिवशी हजारापेक्षा जास्त रूग्ण

सकाळ डिजिटल टीम

Corona Update : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यात एक हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी राज्यात एक हजार 134 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज दिवसभरात राज्यातील तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

आरोग्य विभागाने माहिती दिली आहे की, राज्यात शुक्रवारी 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत एकूण 77,37,355 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 8.06% झाले. तर यासोबतच आज तीन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 127 इतकी झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे BA4 आणि BA5 सब-व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

या दरम्यान राजधानी मुंबईत कोरोना रूग्णसंख्येनं वेग घेतला आहे, सध्या राज्यात सर्वाधिक सध्या 3735 सक्रीय रुग्ण मुंबईत आहेत. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के सक्रीय रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. ठाणे 658, रायगड 108 आणि पुणे 409 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत आज 763 कोरोना रुग्ण आढळले तर ठाणे मनपा 77, नवी मुंबई 71, पुणे मनपा 72 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

SCROLL FOR NEXT