coona vaccine. 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्याची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल? कोरोनाबाधितांचा नवा उच्चांक

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. शिवाय कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, तर कडक लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच गेल्या 24 तासांतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 63 हजार 294 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 34 हजार 008 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोना महामारीमुळे 57 हजार 987 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत  34,07,245 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर  27,82,161 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. राज्यात सध्या  5,65,587 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मण बांदल; शशिकांत शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Latest Marathi News Update : पुण्यात बी. जे. मेडिकल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु

Bangladesh Onion Export : कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू, श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी; भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान

SCROLL FOR NEXT