corono_ 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: आजची कोरोना आकडेवारी भीतीदायक; राज्याची वाटचाल लॉकडाऊनकडे?

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 35952 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात गेल्या 21 तासांत 20444  रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. आतापर्यंत 2283037 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रात सध्या 262685 कोरोनाचे संक्रिय रुग्ण असून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटताना दिसत आहे.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. बुधवारी राज्यात 32 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यात आज मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे. 
 

गेल्या 24 तासांत 111 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 26,00,833 रुग्ण आढळून आले आहे, तर 22,83,037 रुग्णांनी कोरोना विषाणूला हरवलं असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. राज्यातील  53,795 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलाय. सध्या राज्यात कोरोनाचे 2,62,685 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य पुन्हा लॉकडाऊनमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Darshan: भीमाशंकर मंदिराला पाण्याचा वेढा; भाविकांच्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर, दर्शनासाठी येणार असाल तर ही बातमी वाचा!

Powai Lake: मुंबईकरांची धडधड वाढली! तलावातून 7 फूट मगर बाहेर आली; नागरिकांची धावपळ, वन विभागाने अनर्थ टाळला

Latest Marathi News Update : मिसिंग लिंकवर दरड कोसळली, दरड आम्ही आणली नव्हती : बावनकुळे

Ajinkya Rahane: 'वर्ल्ड कपचा हिरो अन् संघाबाहेर?' संजू सॅमसनच्या निवडीवर रहाणेचा थेट सवाल; BCCI ला सुनावलं?

Ethanol Petrol Issues : पावसाळ्यात तुमचीही दुचाकी अचानक बंद पडतेय? पेट्रोलमधील 'या' गोष्टीमुळे वाढली वाहनचालकांची डोकेदुखी; कशी घ्यावी खबरदारी?

SCROLL FOR NEXT