corona_pune_
corona_pune_ 
महाराष्ट्र

Corona Update: राज्यातील परिस्थिती चिंताजनक; कोरोना रुग्णसंख्या वाढली

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 43,183 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे, तर 32,641 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. गेल्या चोवीस तासांत 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मृतांचा आकडा वाढला असल्याचं दिसत आहे. बुधवारी राज्यात ४० हजारांच्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यात गुरुवारी आणखी वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यात 28,56,163 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 3,66,533 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत, तर 54,898 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 24,33,368 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली असून लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलंय. 
 

मुंबईत कोरोना रुग्णांसह मृत्यूचा आकडा वाढल्याने चिंता वाढली आहे. नव्या रुग्णांचा आज विस्फोट झाला असून एकूण 8646 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तर आज 18 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याचे दिसत आहे. मुंबईत आज तब्बल 8646 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 4,23,360 वर पोहोचला आहे, तर, सक्रिय रुग्णांनी 55,005 हजारांचा टप्पा गाठला आहे. सक्रिय रुग्ण वाढत असल्याने चिंता ही वाढली आहे. आज दिवसभरात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 704 वर पोहोचला आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात ६० ते ७० टक्के रुग्ण आहे. राज्याच्या दृष्टीने ही चिंता वाढवणारी बातमी आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. शिवाय अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लादण्यात आलं आहे. संपूर्ण राज्यात कठोर लॉकडाऊन करायचा नसेल, तर लोकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT