corona
corona 
महाराष्ट्र

Corona Update: राज्यात गेल्या 24 तासांत 56 हजार नवे रुग्ण; 376 जणांचा मृत्यू

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- महाराष्ट्रात कोरोनास्थिती गंभीर बनताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पुढे आढळून येत आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 56 हजार 286 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 36 हजार 130 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 376 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची आतापर्यंतची संख्या 32 लाख 29 हजार 547 झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे  5 लाख 21 हजार 317 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 26 लाख 49 हजार 757 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत  57 हजार 028 रुग्णांचा मृत्यू झालाय. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. राज्यात लसीकरणाने गती घेतलीये. पण, राज्यात कोरोना लशींची कमतरता जाणवत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस पुरेल इतकाच कोरोना लशींचा साठा आहे. केंद्र सरकार कोरोना लशींचा पुरवठा करण्याबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप राजेश टोपे यांनी केला आहे. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्य सरकार हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यात वाद पेटला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT