Corona Patient sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील रुग्णसंख्या उतरणीला; दिवसभरात तीस हजारहून कमी रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही निर्बंध कडक केले होते. तसेच शाळा-कॉलेजेस देखील बंद केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा निर्बंध शिथिल करण्यात येत असून शाळा-कॉलेजेस देखील सुरु करण्यात येत आहेत. कोरोनाची (Corona) रुग्णसंख्या आता उतरणीला लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाळीस हजारच्या वर दैनंदिन रुग्णसंख्या होती मात्र, आता ती तीस हजारच्याही खाली गेल्याने दिलासा मिळाला आहे. (Corona Update Maharshtra)

आज राज्यात २८,२८६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर राज्यात आज ३६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,३५,११,८६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७५,३५,५११ (१०.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,३५,१४१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,४०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमिक्रॉनबाबत काय आहे सध्यस्थिती?

आजपर्यंत राज्यात एकूण २८४५ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. आज राज्यात ८६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे -

• नागपूर- ४७

• पुणे मनपा-२८

• पिंपरी चिंचवड मनपा-३

• वर्धा-२

• मुंबई, अमरावती, यवतमाळ, भंडारा, ठाणे मनपा, आणि पुणे ग्रामीण- प्रत्येकी-१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT