महाराष्ट्र बातम्या

कोरोनाने मृत्यु झाल्यास मिळणार 30 लाख रुपये; कुणी घेतला हा निर्णय 

संतोष सिरसट

सोलापूर ः राज्यातील सुमारे दोन कोटी 60 हजार ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व दर्जेदार सेवा देण्यासाठी कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावात महावितरणचे कर्मचारी अविश्रांत कार्य करत आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना 30 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्वाचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

महावितरणमध्ये संचालन व दुरूस्तीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना (बाह्यस्त्रोत) तसेच महावितरणच्या विविध कार्यालयात कार्यरत असणारे सुरक्षा रक्षक यांना देखील 30 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. 

कोरोनाच्या सार्वत्रिक प्रादुर्भामध्ये महावितरणचे अभिंयते, कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. राज्य प्रशासन कोरोनाचा पराभव करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असताना राज्यातील सामान्यांना घरातच थांबणे आवश्‍यक आहे. अशा घरात राहणाऱ्या व घरूनच कामे करणाऱ्यांना महावितरणने 24 तास अखंडित वीजपुरवठा देऊन मोठा दिलासा दिला आहे. याद्दष्टिने महावितरणचे कर्मचारी देखील हे कोरोनायोध्दे ठरले आहेत. कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभागाने गांभीर्य राखून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

महावितरणचे तांत्रिक तसेच अतांत्रिक प्रवर्गात कार्यरत असणारे सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू राहणार आहे. कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा कोविड-19 विषाणूने झाला असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र हे शासकीय/पालिका/महापालिका/आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये/प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेले असावे. हे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे. 


 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत; शेअर केली भावनिक पोस्ट

Meta Layoffs : AI आणि ऑटोमेशनचा दबाव वाढला! Meta मध्ये मोठ्या बदलांची सुरुवात; नव्या प्लॅनमध्ये ८,००० नोकऱ्या धोक्यात

MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्याय

Post Result Anxiety: 90-95% गुण मिळूनही मुलं आनंदी का नाहीत? ‘पोस्ट-रिझल्ट अँझायटी’ म्हणजे काय आणि पालकांनी काय करावं?

Latest Marathi News Live Update : सीएसएमटीच्या स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT