stress 
महाराष्ट्र बातम्या

कोरोनासह नोकरी, व्यवसायाचाही तणाव; नैराश्‍य,व्यसनाधीनतेमध्ये चिंताजनक वाढ 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाले आहेत. देशभरात गेल्या चार महिन्यांत अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले. मोठ्या कंपन्यांनी उत्पादन कमी किंवा थांबवल्यामुळे नोकरकपात केली. काही कंपन्यांमध्ये कर्मचारी घरुन काम करीत असले, तरी तेथेही वेतनात कपात झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक, नोकरदार तसेच हातावर पोट असणाऱ्या कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली असून याचे विपरीत परिणाम होण्याची भीती नवी मुंबईच्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या दोन महिन्यांत अकारण भीती वाटणे, शांत स्वभावाच्या व्यक्तीत अचानक रागाची भावना निर्माण होणे, नोकरी गेल्यामुळे अथवा धंदा बंद झाल्यामुळे व्यसनाधीन होणे, अशा अनेक तक्रारी वाढल्या आहेत. त्यासोबतच कोरोनाग्रस्त नागरिकांमध्ये मानसिक ताणतणाव वाढत आहे. त्यासाठी ‘कोरोना आज है, कल नही’ ही संकल्पना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये राबवली जात आहे, अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे मनोविकारतज्ज्ञ डॉ. ओंकार माटे यांनी दिली.

६० टक्के रुग्णांत अस्वस्थता
कोरोनाची लागण झालेल्या ६० टक्के व्यक्तींमध्ये मानसिक आजारांची लागण होऊ शकते, असा निष्कर्ष ‘लॅन्सेट’ अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. कोरोनामुळे आता आर्थिक अस्थिरतेचा खूप मोठा धोका भारताला आहे आणि तो दीर्घ काळ टिकणारा आहे. आर्थिक अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या चिंतेच्या वातावरणात रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग, लठ्ठपणा तसेच, व्यसनाधीनता यांचेही प्रमाण वाढण्याची शक्‍यता असल्याची माहिती मनोविकारतज्ज्ञ डॉ. ओंकार माटे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे केले जाते
उपचारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची भीती घालवण्याचे काम 
मनःशांतीसाठी योगाचे ऑनलाइन प्रशिक्षण
कुटुंबातील सुसंवाद कसा वाढवावा,  समस्येतून संधी कशी निर्माण करावी, यावर मार्गदर्शन

तणाव वाटत असेल तर...
मित्र-मैत्रिणी, शेजारी व नातेवाईकांशी बोला. 
घरातील वातावरण आनंदी ठेवा.
समुपदेशकाबरोबर बोलावे किंवा मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा 
वाचन, लिखाण, व्यायाम करावा, चित्र काढावे, संगीत ऐकावे, चांगले चित्रपट विशेषत: हास्यपट पाहावेत
कुटुंबातील सदस्यांशी नियमित संवाद ठेवावा. 
मानसिक आजारांवर उपचार करण्यास पुढे यावे
व्यसनापासून लांबच राहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT