Umesh Ghevarikar
Umesh Ghevarikar 
महाराष्ट्र

Video: एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती...

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव (नगर): राष्ट्रीय आपत्तीच्या काळात शिक्षक आणि कलावंत यांची सामाजिक जबाबदारी दुपटीने वाढते, याच भावनेतून येथील बाळासाहेब भारदे हायस्कूल मधील उपक्रमशील शिक्षक आणि रंगकर्मी उमेश घेवरीकर यांनी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती अभियान राबवले आहे.

 अवघ्या दहा मिनिटांच्या या प्रयोगाचे लेखन दिगदर्शन व सादरीकरण त्याचेच असून सहज सोपी भाषा, सुंदर अभिनय लोकप्रिय गाण्यांचा वापर, अचूक टायमिंग आणि मार्मिक संवादाच्या माध्यमातून या प्रयोगातून कोरोनविषयी सर्वसामान्य जनतेने काय काळजी घ्यावी, प्रशासनास सहकार्य करण्याची गरज व स्वयंशिस्त पालनाची गरज हीच देशभक्तीची खरी व्याख्या असल्याचा संदेश प्रभावीपणे देण्याचा त्यांचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणकारांच्या पसंतीस उतरत आहे. याच विषयावरील त्यांची दोन प्रहसने देखील अहमदनगर आकाशवाणी तसेच इतर समाज माध्यमातून नेटकर्यांच्या पसंतीस उतरत असून, कलाक्षेत्रातील अनेक जाणकारांनी त्यांच्या या उपक्रमाचे व सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे.

श्री. उमेश घेवरीकर हे उपक्रमशील शिक्षक असून, विविध सामाजिक प्रश्नावर यापूर्वी त्यांनी पथनाट्ये, लघुपट व नाटकांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम जाणीवपूर्वक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT