Serum Institute 
महाराष्ट्र बातम्या

Serum Institute: नागपूर खंडपीठाचा अदर पूनावाला यांना धक्का; बजावली नोटीस

नागपूर खंडपीठाचा अदार पूनावाला यांना धक्का

धनश्री ओतारी

सीरम इन्स्टिट्यूट आणि अदर पूनावाला यांना अव्हेकन इंडिया मुव्हमेंटच्या सदस्यांविरुद्ध खोटा प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी नागपूर खंडपीठाने कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. लसीचे घातक दुष्परिणाम लपवून लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा खोटा दावा करून या लसीवर बंदी का घालू नये असा प्रश्न विचारत याची कारणे दाखवा नोटीस नागपूर खंडपीठाने बजावली आहे.(court issues 10000 crore compensation notice to adar poonawalla and serum institute )

अवेकन इंडिया मूव्हमेंटच्या संयुक्त विद्यमाने डॉ. स्नेहल लुनावत यांच्या कोविशील्डमुळे झालेल्या मृत्यूच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने अदर पूनावाला आणि बिल गेट्स यांना 10,000 कोटींच्या नुकसानभरपाई याचिकेतर्फे कोर्टाने नोटीस बजावली आहे.

हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू, सांधेदुखी, अंधत्व, बहिरेपणा, मधुमेह, किडनी निकामी होणे, कर्करोग, त्वचारोग, मेंदूच्या (न्युरोलॉजिकल) समस्या, कोणत्याही रोगाशी लढण्याची क्षमता कमी होणे, कोरोनापेक्षा लसीमुळे होणारे मृत्यू. असे शोधनिबंध आणि जगभरातून तक्रारी येत आहेत. असं याचिकेमध्ये म्हटलं आहे.

अशाच कारणांमुळे 21 युरोपीय देशांनी कोविशील्डवर बंदी घातली आहे. पण अदर पूनावाला आणि त्यांचे भागीदार बिल गेट्स यांच्यासह देशाचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासारख्या भ्रष्ट व्यक्तींनी ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे खोटे बोलून अनेक वेळा जबरदस्तीने लसीकरण केले.

अवेकन इंडिया मूव्हमेंट, इंडियन बार असोसिएशन आणि इतर अनेक जागरूक मानवाधिकार संघटनांनी या विरोधात आवाज उठवला, आरोपींवर खटले दाखल केले आणि अनेक प्रकरणांमध्ये बेकायदेशीर निर्बंध रद्द करण्यासाठी न्यायालयाचे आदेश मिळवले.

या सर्व कार्यकरत्यांविरुद्ध अदर पूनावाला यांनी पुणे पोलिसात खोटी तक्रार दाखल करून अटक करण्याची मागणी केली. पुणे पोलिसांनी सिरम इन्स्टिट्यूटची खोटी तक्रार फेटाळून लावली. त्यानंतर देशभरातील 3000 हून अधिक सदस्यांनी सीरम इन्स्टिट्यूटला सुमारे 4 लाख कोटींच्या नुकसानभरपाईच्या नोटिसा पाठवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT