महाराष्ट्र बातम्या

Covid Scam : हद्द झाली! मृतदेहांच्या बॉडीबॅग खरेदीत घोटाळा? बोगस डॉक्टर अन् बोगस कर्मचारी...

संतोष कानडे

मुंबईः मुंबई महानगर पालिकेने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी कालपासून ईडीने धाडसत्र सुरु केले आहे. या प्रकरणात आता एक अपडेट येत असून चक्क मृतदेहांसाठीच्या बॅग खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं पुढे येत आहे.

मुंबईतील कोविड घोटाळ्याबाबत ईडीकडून धाडसत्र सुरु झाले आहे. ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या लोकांकडे ईडीने धाड टाकली. आज मुंबई महानगर पालिकेच्या भायखळा येथील कार्यायात ईडीने धाड टाकली. याप्रकरणी अजूनही चौकशी सुरु आहे.

'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तानुसार वाढीव दराने औषध खरेदी, मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीत घोटाळा आणि बोगस कर्मचारी दाखवून गैरव्यवहार झाला, हे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलेले आहे. ईडीच्या तपासात असं समोर आलेलं आहे की, ज्या बॉडी बॅग्स मार्केटमध्ये दोन हाजारांना मिळत होती. त्या ६ हजार ८०० रुपयांना विकत घेतल्या.

ज्या कोविड सेंटर्सला औषधं पोहोचवली होती. ती २५ ते ३० टक्के दराने महानगर पालिकेने विकत घेतलं. काही अधिकाऱ्यांना आक्षेप नोंदवले होते. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली वेंडर्सकडून विकत घेतली. तसेच लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने स्टाफ खर्चाची बिलं महानगर पालिकेला दिले, त्यामध्ये गैरकारभार झालेला आहे. ज्यांनी कधीच डॉक्टर आणि इतर स्टाफ म्हणून काम केलं नाही त्यांच्या नावे पैसे उकळले गेले. काल जी धाड टाकली गेली त्यात ६८.५ लाख रुपये कॅश रिकव्हरी झाल्याचं पुढे येत आहे.

बॉडी बॅग्स प्रकरणात किशोरी पेडणेकर यांचं नाव?

२ हजारांचे बॅग्स ६ हजार ८०० खरेदी केले. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांचं नाव पुढे येत आहे. मात्र पेडणेकर यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. आज दुसऱ्या दिवशी ईडीची चौकशी सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या भायखळा कार्यालयात आज ईडीने धाड मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT