Dilip Walse Patil Dilip Walse Patil
महाराष्ट्र बातम्या

55 वर्षावरील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' ; दिलीप वळसे पाटील

भारतात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पटीने वाढत आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करता येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पोलिस कर्मचाऱ्यांना जास्त प्रमाणात कोरोनाची लागण झाली तर त्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पटीने वाढत आहे. यातच आता दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नव्याने आढळलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) आता जगभरासह भारतातदेखील (Omicron cases in India) आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत याची संख्या जादा असल्याने लाॅकडाऊन लागेल का याची भिती लागून राहिली असतानात पोलिस कर्मचाऱ्यांना देखील जादा प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) माध्यमांशी संवाद साधला.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे जिल्ह्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. कोरोनाची (Corona) स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात 74 टक्के नागरीकांनी दोन डोस घेतलेला आहे. माझी पुणेकरांना विनंती आहे की टोकाचं पाऊल उचलायला लावू नका. आज काही निर्णय घेतोय. उर्वरित लोकांनी डोस घेतलाच पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT